छोट्या मुलीने लाँग स्कर्ट-चोळी घालून केलाय गोड डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी भारावले

सध्या व्हायरल (Viral) होणाऱ्या व्हिडिओमध्ये (video) एक छोटी मुलगी दिसत आहे. या मुलीने गोड मोकअप केला असून ती अतिशय छान दिसत आहे. लाँग स्कर्ट आणि पिवळ्या रंगाची चोळी घातलेली ही मुलगी अतिशय गोड डान्स करत आहे. तिचा डान्स पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

  मुंबई : सोशल मीडियाचं विश्व मोठं मजेदार आहे. या मंचावर कधी कशाची चर्चा होईल हे सांगता येत नाही. सध्या तर एका छोट्या मुलीचा मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छोटी मुलगी (little girl) अतिशय मनमोहक डान्स (dancing) करत आहे. मुलीच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  व्हिडिओमध्ये आहे काय?

  सध्या व्हायरल (Viral) होणाऱ्या व्हिडिओमध्ये (video) एक छोटी मुलगी दिसत आहे. या मुलीने गोड मोकअप केला असून ती अतिशय छान दिसत आहे. लाँग स्कर्ट आणि पिवळ्या रंगाची चोळी घातलेली ही मुलगी अतिशय गोड डान्स करत आहे. तिचा डान्स पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

  पंजाबी-राजास्थानी गाण्यावर मुलीचा मजेदार डान्स

  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील मुलीचे नाव ईशान्वी हेगडे असे आहे. ही मुलगी तिच्या आईसोबत वेगवेगळ्या गाण्यांवर मजेदार डान्स करत असते. यापूर्वीसुद्धा तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. मात्र, सध्याच्या व्हिडिओमध्ये लाँग स्कर्ट आणि चोळी घालून पंजाबी आणि राजस्थानी संस्कृतीची झालर असलेल्या गाण्यावर (punjabi rajasthani song) ईशान्वी थिरकत आहे. म्हणूनच नेटकऱ्यांना तिचा हा डान्स विशेष रुपाने आवडत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nivi & Ishanvi (@nivedithashetty)

  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल video went viral on social media

  हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी ही मुलगी अतिशय छान डान्स करत असल्याची कमेंट केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी ही मुलगी भविष्यात चांगली डान्सर होणार असे भाकीत वर्तविले आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ nivedithashetty या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

  on punjabi rajasthani song little girl dancing video went viral on social media nrvb