स्वराच्या ट्वीटवर सुमित नाराज म्हणाला, “सर्वांना विचारधारेची पडलेय बाकी सर्व गेलं तेल लावत”

स्वरा भास्करने तालिबानची तुलना भारतातील हिंदुत्ववाद्यांशी केली. त्यामुळे तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. एवढच नाही तर स्वराच्या अटकेसाठी ट्वीटरवर 'अरेस्ट स्वरा भास्कर' असा हॅशटॅग देखील ट्रेंड केला जात आहे.

  तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतलं आहे. तिथून येणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ खूपच भयानक व अंगावर शहारे आणणारे आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर जगभरातील सर्वच लोक आपलं मत व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही या प्रकरणी आपलं मत व्यक्त केलं आहे, पण त्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. एवढंच नाही तर स्वरा भास्करला अटक करण्याची मागणी देखील होत आहे.

  ‘अरेस्ट स्वरा भास्कर’ हॅशटॅग ट्रेंड

  स्वरा भास्करने तालिबानची तुलना भारतातील हिंदुत्ववाद्यांशी केली. त्यामुळे तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. एवढच नाही तर स्वराच्या अटकेसाठी ट्वीटरवर ‘अरेस्ट स्वरा भास्कर’ असा हॅशटॅग देखील ट्रेंड केला जात आहे.

  स्वराच्या या ट्वीटवर आता मराठी अभिनेता सुमित राघवने देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपलं मत व्यक्त करताना सुमितने “तुम्हाला कंगनाने मुंबईची तुलना POK शी केल्यावर राग पण स्वराने हिंदुत्वाची तुलना दहशतवाद्यांशी केली की शांत बसता.” असं म्हणत लोकांच्या मानसिकतेवर टीका केली आहे.

  काय म्हणाला सुमित राघवन?

  “जेव्हा कंगनाने मुंबईला POK म्हटलं तेव्हा बवाल झाला होता. सर्व लोक ज्ञान पाजळत होते. तिचं ऑफीस देखील तोडलं. पण, जेव्हा स्वरा हिंदुत्व टेरर म्हणते तेव्हा सर्वांच्या तोंडात दही जमा होतं. तेव्हा कुणाच्या भवना दुखावत नाहीत. हो ना? सर्वांना विचारधारेची पडली आहे बाकी सर्व गेलं तेल लावत.”

  नेमकं काय म्हणाली स्वरा भास्कर

  स्वरा भास्करने तिच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, “तालिबानच्या दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण आणि उद्ध्वस्त झाला आहे. त्याचप्रमाणे देशातील हिंदुत्ववादी दहशतीचे देखील समर्थन होऊ शकत नाही. आम्ही तालिबानच्या दहशतीसह शांत बसू शकत नाही आणि मग हिंदुत्वाच्या दहशतीबद्दल राग येऊ शकतो. आमची मानवतावादी आणि नैतिक मूल्ये अत्याचारी किंवा दडपशाहीच्या ओळखीवर आधारित नसावीत.”