आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर; सरकारने ‘तो’ निर्णय रातोरात घेतला मागे

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील 18 जिल्ह्यात होमक्वारंटाईन बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तथापि, उशिरा रात्री या निर्णयावर सरकारनेच घुमजाव केले. कोणाच्या दबावाखाली सरकारने निर्णय फिरविला असा सवाल आता केला जात आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार अधिकाधिक रुग्णांना सरकारच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे म्हटले आहे. या मोहिमेत सर्वाधिक भर ग्रामीण भागावर देण्यात आला आहे. या भागातील बाधितांची रवानगी सरकारच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्याबाबत नियम करण्यात आले आहेत.

  मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील 18 जिल्ह्यात होमक्वारंटाईन बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तथापि, उशिरा रात्री या निर्णयावर सरकारनेच घुमजाव केले. कोणाच्या दबावाखाली सरकारने निर्णय फिरविला असा सवाल आता केला जात आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार अधिकाधिक रुग्णांना सरकारच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे म्हटले आहे. या मोहिमेत सर्वाधिक भर ग्रामीण भागावर देण्यात आला आहे. या भागातील बाधितांची रवानगी सरकारच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्याबाबत नियम करण्यात आले आहेत.

  आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर

  18 जिल्ह्यांत होमक्वारंटाईनवरील बंदीचा निर्णय बाधित रुग्ण बाहेर फिरत असल्यानेच घेतला होता. परंतु महाविकास आघाडीत सहभागी घटक पक्षांमध्येच एकवाक्यता नसल्याने या निर्णयावर अंमलबजावणी होऊ शकली नाही. बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना सरकारच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवण्याचा उत्तम पर्याय होता परंतु आघाडीतील बिघाडीमुळेच हा निर्णय फिरविण्यात आल्याची चर्चा आहे.

  समन्वयाचा अभाव

  18 जिल्ह्यात होमक्वारंटाईन बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आळा होता. पवारांचा हा निर्णय सरकारमध्ये सहभागी अन्य घटक पक्षांच्या पचनी पडला नाही. या निर्णयामुळे सरकारच्या क्वारंटाईन सेंटरवर दबाव येईल असे कारण पुढे करीत त्यांना या निर्णयास पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळेच सरकारच राज्यात ‘सुपर स्प्रेडर’ला उत्तेजन देत असल्याचेही दिसून येते.

  लाचारी नडली

  जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना संक्रमण पसरविण्यात होम क्वारंटाईन रुग्णच सुपर स्प्रेडर ठरत आहेत. बाहेर फिरण्यास बंदी असल्यानंतरही ते फिरत असून अन्य लोकांनाही बाधित करण्याचे काम ते करीत आहेत. हा प्रकार रेड झोन असो वा नॉन रेड झोनमध्ये सर्रास सुरू आहे. होम क्वारंटाईनमधील एक जरी रुग्ण बाहेर फिरला तर तो हजारो लोकांना बाधित करू शकतो. त्यामुळेच ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची गरज होती परंतु तीन पक्षांच्या सरकारची लाचारी आड आली आणि हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे जर होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर फिरला आणि कोरोना पुन्हा पसरला तर त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारचीच असेल, असा सूरही लावला जात आहे.