भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष, एकनाथ खडसेंच्या उपस्थितीकडे सगळ्यांचे डोळे

भाजपा पक्षाकडून सातत्याने होत असलेल्या न्यायामुळे एकनाथ खडसे ( Eknath Khadse) सध्या बंडखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. फडणवीसी सरकारच्या काळात मंत्रीपद गमवावे लागलेल्या एकनाथ खडसेंवर त्यानंतर सातत्याने पक्षात अन्याय होताना दिसतो आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही खडसेंना स्थान मिळाले नसल्याने ते पक्षावर नाराज आहे.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या (BJP) नव्या प्रदेश समितीची बैठक आज मुंबईत होते आहे. या बैठकीला राज्यातील मोठे नेते प्रत्यक्षात किंवा ई सहभागाद्वारे उपस्थित राहणार आहे. सध्या पवारांच्या ( SHARAD PAWAR) भेटीची चर्चा असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे या बैठकीत सहभागी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भाजपा पक्षाकडून सातत्याने होत असलेल्या न्यायामुळे एकनाथ खडसे ( Eknath Khadse) सध्या बंडखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. फडणवीस सरकारच्या काळात मंत्रीपद गमवावे लागलेल्या एकनाथ खडसेंवर त्यानंतर सातत्याने पक्षात अन्याय होताना दिसतो आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही खडसेंना स्थान मिळाले नसल्याने ते पक्षावर नाराज आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने पक्षाविरोधात जाहीर वक्तव्ये करतानाही दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. बुधवारी मुंबईत शरद पवारांच्या भेटीसाठी एकनाथ खडसे आल्याचेही सांगण्यात येत होते. ही भेट झाली की नाही, याबाबत अद्याप माहिती नसली तरी एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित मानण्यात येतो आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे आजच्याप्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला जातात का, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ई संभाषणाने प्रदेश कार्यकारिणीची सुरुवात होणार असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यसमितीचा समारोप करणार आहेत.