कोरोना योद्धा दिना निमित्त गोवा, मुंबईतील हॉस्पिटलवर करणार पुष्पवृष्टी

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धा बनून दिवस रात्र सेवा करत आहेत. अशा या कोरोना योद्धांना सलाम करण्यासाठी भारतीय नौदलालाकडून ३ मे हा ''कोरोना योद्धा दिन'' साजरा करण्यात येणार आहे.

नौदलाकडून कोरोना योद्धयांना सलाम – केईएम, कस्तुरबा, जेजे हॉस्पिटल वर करणार पुष्पवृष्टी

 
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धा बनून दिवस रात्र सेवा करत आहेत. अशा या कोरोना योद्धांना सलाम करण्यासाठी भारतीय नौदलालाकडून ३ मे हा ‘कोरोना योद्धा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मुंबई आणि गोव्यामध्ये कोरोनाचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या हॉस्पिटलवर नौदलाकडून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 
 
‘कोरोना योद्धा दिना’ निमित्त नौदलाकडून मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि गोव्यातील नौदलाच्या हवाई तळावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय नौदलाकडून रविवारी सकाळी १० ते १०. ३० च्या दरम्यान मुंबईतील पालिकेच्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटल आणि कुलाबा येथील आयएनएचएस अश्विनी तसेच गोव्यातील जीएमसी आणि ईएसआय हॉस्पिटल, पालिकेचे केइएम, जेजे हॉस्पिटल या होस्पिटलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना योद्ध्यांना सलाम करण्यासाठी नौदलाकडून मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे रविवारी सकाळी ७.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रमात नौदलाच्या ५ जहाजांवरील नौसैनिकांकडून कोरोना योद्धांना सलाम करण्यात येणार आहे. यावेळी अँकरएज येथे सकाळी ७.३० वाजता जहाजावरील सायरन वाजवून आणि ज्योत प्रज्वलित करून सलामी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोवा येथील हवाई तळावर नौदलाकडून कोरोना योद्ध्यांसाठी मानवी साखळी उभारण्यात येणार आहे. या मानवी साखळीतून ‘इंडिया सॅल्यूट कोरोना वॉरियर्स’ असा मेसेज देण्यात येणार आहे. परंतु यावेळी सोशल डिस्टंसिंग राखण्यात येणार आहे.