Sharad Pawar

जीवेत शरदः शतम्' म्हणजे 'शतायुषी व्हा' असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८०असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar 80th Birthday) यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. देशाचे सगळ्यात अनुभवी नेते, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार शरद पवार हे आज ८० वर्षांचे झाले आहेत. कोविडचे संकट नसते तर श्री. पवार यांच्या८० व्या वर्षपूर्तीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला असता, त्यांचे अनेक नागरी सत्कार झाले असते, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असते. प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेल्या पवारांनी चाहत्यांच्या या उत्साहावर बंधने घातली आहेत.

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उधळली स्तुतीसुमनं

जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८०असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. ८० व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. कोविड काळात, निसर्ग चक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे पवार हे ८० वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत.’ असं म्हणत सेनेनं बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीला उजाळा दिला.

दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसाला ऑनलाइन शुभेच्छा देण्याची व्यवस्था यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शरद पवार शिल्पकार आहेत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचेही दिग्गज नेते आणि मंत्री येणार असल्याची माहिती मिळत आहे.