मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश १५ जुलै ते ३१ जुलै पर्यंत लागू : गृह मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती

राज्यात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसे करणा-याला प्रत्येकी हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. सर्व सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि समुद्र किनारे या ठिकाणी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    मुंबई : येत्या आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. केंद्र सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भुमिका घ्यावी यासाठी मागील काळात विवीध संघटनाकडून मागणी केली जात आहे.

    या पार्श्वभुमीवर कोरोना काळात आंदोलने केली जाण्याची शक्यता विचारात घेत मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश १५ जुलै ते ३१ जुलै पर्यंत लागू करण्यात आले आहेत. त्या सोबतच राज्यात सर्वत्र १५ जुलै रोजी सकाळी ७ पासून जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील गृह विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

    नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन

    यामध्ये याकाळात राज्यात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसे करणा-याला प्रत्येकी हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. सर्व सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि समुद्र किनारे या ठिकाणी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हा आदेश मोडणा-यास  हजार रुपये दंड किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  दरम्यान राज्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आला असून मागील २४ तासात मुंबईत केवळ ६३५ नवीन रुग्ण सापडले.