पुन्हा एकदा कोरोनाचे संकट; टेन्शन वाढत असताना महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा देणारी बातमी

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने पून्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली असताना महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट स्थिर आहे.   

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने पून्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली असताना महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट स्थिर आहे.

सोमवारी राज्यात २,८३४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज ५५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७%  एवढा आहे. आज राज्यात ६,०५३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर, राज्यात आतापर्यंत १७,८९,९५८ कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९४.२४ % एवढा झाला आहे.  आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८८,७६७ इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,४६९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, सोमवारी राज्यात ५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ५५ मृत्यूपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू हे एका आठवड्यापेक्षा अधिक कालाधीपूर्वीचे आहेत.

हे १६ मृत्यू गडचिरोली-७, पुणे-५, औरंगाबाद-१, कोल्हापूर-१, नागपूर-१ आणि नाशिक- १ असे आहेत.  दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२१,५७,९५३ प्रयोगशाळा नुमन्यांपैकी १८,९९,३५२ (१५.६२ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०४,९३८ व्यक्ती होमक्वारंटाईन असून ३,५७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.