One crore increase in MLA's fund Mahavikas Aghadi government's decision

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनामुळे विकासकामांच्या निधीला गेल्या दिड वर्षापासून मोठ्या प्रमाणात कात्री लावण्यात आली होती. मात्र राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत दिवाळीपूर्वी १ कोटी रुपयांची वाढ(One crore increase in MLA's fund ) करण्यात येणार आहे(Mahavikas Aghadi government's decision). या निधीतून आमदारांना मतदारसंघातील रखडलेल्या तातडीच्या विकास कामांना चालना देता येणार आहे.

  मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनामुळे विकासकामांच्या निधीला गेल्या दिड वर्षापासून मोठ्या प्रमाणात कात्री लावण्यात आली होती. मात्र राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत दिवाळीपूर्वी १ कोटी रुपयांची वाढ(One crore increase in MLA’s fund ) करण्यात येणार आहे(Mahavikas Aghadi government’s decision). या निधीतून आमदारांना मतदारसंघातील रखडलेल्या तातडीच्या विकास कामांना चालना देता येणार आहे.

  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर परिणाम

  येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत. यंदा पावसामुळे सारीकडे रस्ते आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. सत्ताधारी आमदारांकडे जनतेकडून गावोगावी याबाबत तक्रारी आल्या आहेत. मात्र विकासनिधीला कात्री असल्याने आमदारांना काही कामे करता आली नाहीत. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता असल्याने सरकारने स्थानिक विकास निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे

  विकास निधी ३ कोटी वरून ४ कोटी

  सध्या आमदारांचा विकास निधी ३ कोटी रुपये आहे. त्यात १ कोटीची वाढ करून तो ४ कोटी करण्यात आला आहे. या निधीतून आमदारांना मतदारसंघातील विकास कामे करता येतात. शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी यासारखी विकास कामे करता येतात. महाविकास आघाडीच्या आमदारांना त्यांच्या कार्यकाळात गेल्या दोन वर्षात फारच कमी विकास निधी मिळाल्याने नेत्याने कामे केले नाहीत, असाही आरोप होतो. त्यामुळे निधी कमी असल्याची ओरड आमदारांकडून केली जाते. त्यामुळेच राज्य सरकारने निर्णय घेत आमदारांच्या स्थानिक निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ करून ती ४ कोटी केलेली आहे.

  वर्षभरानंतर या आश्वासनाची पूर्तता

  यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये एक कोटी रुपयांची वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी सन २०२०-२१चा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे हा विकास निधी देणे शक्य झाले नव्हते. मात्र आता वर्षभरानंतर या अश्वासनाची पूर्तता होत आहे.