MNS riots erupt ... and Amazon office blown up by MNS activists

अ‍ॅमेझॉनच्या वकिलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार मधल्या मारवे रोडवरील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात जात तोडफोड केली होती. तोडफोड प्रकरणी अंधेरी महानगर न्यायालयाने मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : मनसेच्या कार्यकर्त्यांना २५ डिसेंबरला  अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात तोडफोड प्रकरणी अंधेरी महानगर न्यायालयाने मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मराठी भाषेचा वापर करण्याभात अ‍ॅमेझॉनविरोधात मोहीम उघडली आहे. त्याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींना अंधेरी महानगर न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अ‍ॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात खेचल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या अ‍ॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी लक्ष केले होते.

अ‍ॅमेझॉनच्या वकिलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार मधल्या मारवे रोडवरील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात जात तोडफोड केली होती.

मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉनने पाच जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना दिले आहेत. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात फलक लावले होते. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यावर मनसेचे हे फलक पाहायला मिळाले होते.