सायन रुग्णालयातील १५० कोरोना योद्धे पुन्हा सेवेत रुजू

मुंबई:सायन रुग्णालयातील १५० कोरोना योद्धे कोरोनामुक्त झाले असून हे योद्धे पुन्हा वैद्यकीय सेवेत रुजू झाले आहेत. या १५० आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये डॉक्टर , नर्सेस , इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचाही

 मुंबई: सायन रुग्णालयातील १५० कोरोना योद्धे कोरोनामुक्त झाले असून हे योद्धे पुन्हा वैद्यकीय सेवेत रुजू झाले आहेत. या १५० आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये डॉक्टर , नर्सेस , इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यात सर्वाधिक डॉक्टरांचा ही समावेश असल्याचे समजते. हे सर्व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होते पण, त्यांनी कोरोनावर मात करत  ते पुन्हा कामावर सेवा देण्यासाठी रुजू झाले आहेत. 

मागील एक ते दीड महिन्यापासून  सायन रुग्णालयातील एकूण ३०२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील १५० जण बरे झाले असुन बुधवार पासून काही जण तर गुरुवारी काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. या कर्मचाऱ्याना  पीपीई कीट्स व इतर सुविधा  ही देण्यात आली आहेत. दरम्यान, 
सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या सतत संपर्कात आल्यामुळे कर्मचारी कोरोना बाधित होण्याचे प्रमाण वाढते आहे. मे अखेरपर्यंत पालिकेच्या दिड हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असुन जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे. नसायन रुग्णालयात कोविड विभागात काम करणाऱ्या एकूण ३५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ५० डॉक्टरांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
 
आतापर्यंत यातील १५० डॉक्टर्ससह नर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर हजर झाले आहेत. ५० टक्के कर्मचारी रुजू झाले आहेत.
यात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याच्या प्रकृतीत सुधारणा होत  आहे. 
                                                                                                                                                   – डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता सायन रुग्णालय