जी उत्तर विभागात काल दिवसभरात कोरोनाने शंभर रुग्ण बाधित

मुंबई : जी उत्तर विभागात कोरोना संसर्गाने पुन्हा हात पाय पसरण्यास सुरुवात केली असून जी उत्तरमध्ये शुक्रवारी तब्बल १०५ नवीन रुग्णांची भर पडली. धारावीमध्ये आज दिवसभरात ३३ नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या २८८३ इतकी झाली आहे. तर १२४ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दादर मध्ये आज ३३ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही २९१६ इतकी झाली आहे.तर ४५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये आज ३९ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या २६१४ इतकी झाली. तर ४३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर धारावी,दादर,माहिम परिसराचा समावेश असणा-या जी उत्तर विभागात आज १०५ नविन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा ८४१३ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ५१४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

धारावीमध्ये २४८९,दादरमध्ये२३६० तर माहीम मध्ये २०९५ असे एकूण ६९४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १०१० ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.