One person attempted suicide, Mumbai police saved lives

एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याची माहिती एक सामाजिक कार्यकर्ते बीनु वर्गिस यांच्याकडून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना मिळाली होती. हि माहिती मिळताच मुलुंड पोलीस ठाण्यात कळविण्यात आले.

मुंबई : मुलुंडमधील (Mulund) एक व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न (One person attempted suicide) करत होती. या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai police ) यश आले आहे तर या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तूर्तास या व्यक्तीची समजूत काढण्यास नेले आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याची माहिती एक सामाजिक कार्यकर्ते बीनु वर्गिस यांच्याकडून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना मिळाली होती. हि माहिती मिळताच मुलुंड पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. मुलुंड पोलीस ठाण्याच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत.