depression

कोरोनामुळे तरुणांवर मोठा प्रभाव पडला आहे. कोरोनाचा नोकरी, शिक्षण मानवी हक्क तसेच मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. असे या सर्वेक्षणात समोर आले आहे. यामुळे कोरोना परिस्थिती पूर्ववत झाल्यावर तरुणांच्या बाबतील रोजगाराबाबत ठोस उपाययोजना केल्या नाही तर जास्तीत जास्त तरुणाईचे आयुष्य उद्धवस्त होण्याच्या वाटेवर आहे.

मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सारा देशच ठप्प झाला आहे. कोरोनामुळे देशासह जगातही तीच परिस्थिती उद्भवली आहे. कोरोना महामारीमुळे तरुणाईचा आत्मविश्वास ढासळला आहे. त्यामुळे जगभरातील निम्मे तरुण निराशेच्या गर्तेत गेले आहेत. सर्व तरुणांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे निवडलेल्या करिअरवर शंका निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. 

या सर्वेक्षणातून मिळालेला अहवाल चिंताजनक आहे. कोरोनामुळे तरुणांवर मोठा प्रभाव पडला आहे. कोरोनाचा नोकरी, शिक्षण मानवी हक्क तसेच मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. असे या सर्वेक्षणात समोर आले आहे. यामुळे कोरोना परिस्थिती पूर्ववत झाल्यावर तरुणांच्या बाबतील रोजगाराबाबत ठोस उपाययोजना केल्या नाही तर जास्तीत जास्त तरुणाईचे आयुष्य उद्धवस्त होण्याच्या वाटेवर आहे. यामुळे तरुणा वर्गावर फार गंभीर परिणाम उद्भवताना दिसतील. 

कोरोना महामारीने जगभरात मनुष्याच्या जीवनावर मोठी आघात केला आहे. कोरोना महामारी येण्यापुर्वी तरुण वर्गापुढे खुप मोठी आव्हाने होती. त्या आव्हानांनी तरुणांपुढे आक्राव विक्राळ रुप धारण केल्याचे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे तरुण वर्ग अजूनच खचला आहे. असे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. १८ ते २९ वर्षाच्या वयोगटातील १२ हजारपेक्षा जास्त तरुण या सर्वेक्षणात सहभागी होते.