मुंबईत कोरोनाचे १५४० नवे रुग्ण –  ९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई :मुंबईमध्ये गुरुवारी १५४० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९८५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९५२ वर पोहचला

 मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी १५४० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९८५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९५२ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, गुरुवारी मुंबईमध्ये ९७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ६३ पुरुष तर ३४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १० जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ५३ जण हे ६० वर्षांवरील, तर ३४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.मुंबईत कोरोनाचे ७३१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३९ हजार १८३ वर पोहचली आहे. तसेच ५१६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २४ हजार २०९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये २ लाख ४२ हजार ९२३ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. ३ ते १० जूनदरम्यान मुंबईतील कोविड रुग्ण सापडण्याचा दर हा ३ टक्के राहिला आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.