Online fines from unmasked peddlers; Unmasked photo and receipt of fine will come on mobile

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरणाऱ्यांकडून आता ऑनलाइन दंडवसुली केली जाणार आहे(Online fines from unmasked peddlers). यासाठी पालिका एक अत्याधुनिक मोबाईल प्रणाली विकसित करत आहे. या उपक्रमात विनामास्क फिरणाऱ्यांकडून आता रोख २०० रुपये दंड न घेता ऑनलाइन दंड घेतला जाणार आहे. या दंडाची रितसर पावतीही संबंधित नियम मोडणाऱ्याला त्याच्या 'विनामास्क फोटोसह' मोबाईलवर पाठवली जाणार आहे.

  मुंबई : मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरणाऱ्यांकडून आता ऑनलाइन दंडवसुली केली जाणार आहे(Online fines from unmasked peddlers). यासाठी पालिका एक अत्याधुनिक मोबाईल प्रणाली विकसित करत आहे. या उपक्रमात विनामास्क फिरणाऱ्यांकडून आता रोख २०० रुपये दंड न घेता ऑनलाइन दंड घेतला जाणार आहे. या दंडाची रितसर पावतीही संबंधित नियम मोडणाऱ्याला त्याच्या ‘विनामास्क फोटोसह’ मोबाईलवर पाठवली जाणार आहे.

  कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने क्लीनअप मार्शलची नेमणूक केली आहे. खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून या क्लीनअप मार्शलची नेमणूक होते.

  पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये ३० ते ५० क्लीनअप मार्शलकडून कारवाई केली जात असून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. या दंडातील अर्धी रक्कम कंत्राटदाराला दिली जाते तर अर्धी रक्कम पालिकेला मिळते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, नैसर्गिक विधी, अस्वच्छता, मास्क न लावणे यासह विविध प्रकारच्या बाबींवर कारवाई करण्याचे अधिकार मार्शलना देण्यात आले आहेत. मात्र या क्लीनअप मार्शल विरोधात अनेक तक्रारी येत आहेत. याची गंभीर दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी घनकचरा खात्याचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि क्लीनअप मार्शल एजन्सी यांची एक बैठक घेतली होती.

  मार्शलच्या गैरवर्तणुकींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौरांनी मार्शल सेवेत असताना गणवेश सक्तीचा असावा, यासह आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते. ड्युटीवर असताना साध्या कपड्यांत कारवाई करणे, दंड वसुली न करता चिरीमिरी घेणे, नागरिकांना धमकावणे अशा तक्रारी क्निअप मार्शल विरोधात केल्या जात आहेत. शिवाय नागरिक व मार्शलमध्ये खटके उडत आहेत.या गैरवर्तणुकीला चाप लावण्यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलली आहेत.

  ड्युटीवर असताना क्लिनअप मार्शलला गणवेश सक्तीचा असून कोटच्या दोन्ही बाजूला पालिकेचा विभाग, मार्शल व कंत्राटदार एजन्सीचे नाव, क्रमांक लिहिणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसे कोट एजन्सीकडून बनवून घेण्यात आले आहेत.

  अशी होणार कार्यवाही

  क्लीनअप मार्शल विनामास्क नागरिकाचा फोटो काढेल. हा फोटो संबंधिताला दाखवून मोबाईलवरही पाठवला जाईल. शिवाय दंडाची पावतीही मोबाईलवर पाठवली जाईल. हे अँप सध्या विकसित केले जात असून दंड किती दिवसांत भरावा, दंड भरला नाही तर कशी कारवाई करायची. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.यामध्ये क्लीनअप मार्शलला त्याचा विभाग स्वतंत्र करून दिला जाईल. त्यामुळे तो आपल्या कार्यक्षेत्राबाहेर बेकायदेशीररित्या कारवाई करू शकणार नाही. त्यामुळे ही प्रणाली यशस्वी होईल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.