प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

मुंबई : मुंबईत ११ ऑक्टोबरपर्यंत डेंगू चा केवळ एकच रुग्ण सापडला आहे, गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात डेंगूचे 242 रुग्ण सापडले होते, यावर्षी त्या तुलनेने रुग्ण संख्या घटली असल्याचे समोर आले आहे.परंतु, मलेरियाचे १६० रुग्ण आढळले असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ५३६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. हे प्रमाण कमी असले तरीही मलेरिया काही मुंबईकरांची पाठ सोडत नसल्याचेच समोर येत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्ण संख्या घटली

मुंबई : मुंबईत ११ ऑक्टोबरपर्यंत डेंगू चा केवळ एकच रुग्ण सापडला आहे, गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात डेंगूचे 242 रुग्ण सापडले होते, यावर्षी त्या तुलनेने रुग्ण संख्या घटली असल्याचे समोर आले आहे.परंतु, मलेरियाचे १६० रुग्ण आढळले असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ५३६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. हे प्रमाण कमी असले तरीही मलेरिया काही मुंबईकरांची पाठ सोडत नसल्याचेच समोर येत आहे.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इतर आजारांची रुग्ण संख्या कमी झाल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, हिवताप, कावीळ असे विविध आजार पसरतात. यंदा कोरोनाचे संकट ओढावल्याने पावसाळी आजारांना रोखणे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान असले तरीही पालिकेला पावसाळी आजारांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळी आजार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश येऊ लागले आहे. जंतूनाशक फवारणी, डास प्रतिबंधक फवारणी करणे, घरोघरी जाऊन तपासणी करणे, डास उत्पन्न करणारी लाखो ठिकाणे नष्ट करणे, स्वच्छता उपक्रम, नागरिकांमध्ये पावसाळी आणि साथीचे आजार रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती करणे सारखी कामे संबंधित विभाग करत असतात. यातून यंदा साथरोगावर आळा बसल्याचे स्पष्ट होते.गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लेप्टोचा १ व डेंग्यूमुळे दोन जणांना जीव गमावला लागला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेतही ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या कमीच

आजार                           वर्ष २०१९     वर्ष २०२०
मलेरिया                             ५३६            १६०
लेप्टो                                    ३०              १५
डेंग्यू                                   २४२                १
गॅस्ट्रो                                 ३८६              ३१
हिपेटायटिस                         ७०                ३
एच१ एन१                             ४                 ०