सर्व बँकांच्या १० टक्के कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा

पश्चिम आणि रेल्वेने यासंदर्भात परीपत्रक काढले आहे. त्यामुळे खासगी आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड (QR Code) बंधनकारक असेल.

मुंबई : खासगी (Private) आणि सहकारी बँकांमधील (Government Bank) कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने (State Government)  विनंती केल्यानंतर रेल्वे बोर्डाने त्याला मंजुरी दिली. मात्र, १० टक्के कर्मचाऱ्यांनीच लोकलमधून (Local)  प्रवास करता येईल. पश्चिम आणि रेल्वेने यासंदर्भात परीपत्रक काढले आहे. त्यामुळे खासगी आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड (QR Code) बंधनकारक असेल.

प्रत्येक बँकेतील केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करता येईल. याबद्दलचा निर्णय बँकांवर अवलंबून असेल. खासगी आणि सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सूरू होती. बाकीच्यांचा रस्ते मार्गाने प्रवास : हे १० टक्के कर्मचारी ठरवण्याचा अधिकार बँकांना असेल. मात्र, उर्वरित कर्मचाऱ्यांना रस्ते मार्गांनीच प्रवास करावा लागेल. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड बंधनकारक असेल.

सध्याच्या घडीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्याची मुभा आहे. परंतु तरीही रेल्वेच्या डब्यांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे असलेला कोरोनाचा धोका लक्षात घेता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या ३५० फेऱ्या सुरू आहेत.