केईएम रुग्णालयाच्या शवागाराची धुरा केवळ चार कर्मचाऱ्यांवर ?

नीता परब, मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, रुग्ण संख्या तब्बल ३५ हजारांवर गेली आहे, तर मृत्यूचा ११३५ झाला आहे.या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याकरिता राज्य आरोग्य

नीता परब, मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, रुग्ण संख्या तब्बल ३५ हजारांवर गेली आहे, तर मृत्यूचा ११३५ झाला आहे.या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याकरिता राज्य आरोग्य विभागकड़ून नानाविध प्रयत्न सुरु आहेत,परंतु प्रशासनाच्या पदरी मात्र अपयश येत आहे.  दुसरीकडे, पालिकेची चार प्रमुख रुग्णालय केईएम, नायर, सायन, कस्तुरबा या रुग्णालयातील शवागारदेखील मागील काही दिवसांपासून कोरोना मृतांनी भरून गेली आहेत.  ज्यामुळे शवागरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. 

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालयातील शवागारात १३ कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी मागील अनेक दिवसांपासुन रात्रंदिवस सतत कोरोना मॄतदेह प्लास्टिकच्या आवरणात बांधून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहेत, सातत्याने मृतदेहांच्या संपर्कात येत असल्याने कार्यरत १३ कर्मचाऱ्यांपैकी ९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामुळे हे कर्मचारी उपचार घेत आहेत. पुढील १४ दिवस कामावर रुजू होऊ शकत नाहीत.  ज्यामुळे मागील ५ दिवसांपासुन केवळ ४ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ९ कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लागण झाल्याने म्युनिसिपल मजदूर युनियनने अतिरिक्त सहा कर्मचारी प्रशासनाने ताबड़तोब द्यावे, अशी मागणी केली असल्याचे म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.
कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यात येत नसल्याने शवागारांमध्ये या मृतदेहांची व्यवस्था करावी लागत आहेत. महापालिका रुग्णालयात रुग्णांचा वाढत ताण बघता आता शवागारे आणि त्यातील कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता संपत चालली आहे, असे नारकर यांनी सांगितले.  शवागारात काम करणाऱ्याला पुरेसे संरक्षण आणि आराम दिला नाही तर यातील कर्मचाऱ्यांना कोरोना होऊ शकतो. परिणामी सर्वच कर्मचारी जर कोरोनाबाधित झाले तर या महत्वाच्या ठिकाणी कोण काम करणार याचा महापालिका प्रशासनाने तातडीने विचार केला पाहिजे, असे प्रदीप नारकर म्हणाले.