udhav thackrey

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटले असते तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    मुंबई: संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळाआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, अश्या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टिका केली आहे. ते म्हणाले की, गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

    संभाजीराजे छत्रपती यांचे आभार

    यावेळी मुख्यमंत्र्यानी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार मानले. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांचे कान टोचले. ते म्हणाले की, करवीर नगरीत शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सारथीच्या उपकेंद्राचे उद्घाटन होते याविषयी भावना व्यक्त करायला शब्द नाहीत.

    ते सर्व सरकारकडून केले जाईल
    आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटले असते तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.