येत्या ४ दिवसात मंदिरे खुली करा अन्यथा टाळा तोडू, भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचा सरकारला इशारा

मंदिरे अजूनही बंद ठेवण्यात आली आहेत. भाजपाने या आधी मंदिरे सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले परंतु त्याची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही. आता सरकारने १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा टाळी तोडण्यात येतील अशी भूमिका तुषार भोसलेंनी घेतली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व मंदिरे, धार्मिकस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेत सर्व सुविधांना परवानगी दिली परंतु राज्याती मंदिरे खुली करण्यात ठाकरे सरकारने परवानगी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारीची राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भेट घेतली आहे. तसेच त्यांना या संबंधित पत्र दिले आहे. राज्य सरकारने १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली केली नाही (Open temples ) तर मंदिरांची टाळी तोडण्यात येतील असा इशारा (warns the government) भाजप पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंनी दिला आहे.

मागील ८ महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत राज्यातील इतर सर्व गोष्टींना टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास परवनगी दिली आहे. परंतु मंदिरे अजूनही बंद ठेवण्यात आली आहेत. भाजपाने या आधी मंदिरे सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले परंतु त्याची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही. आता सरकारने १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा टाळी तोडण्यात येतील अशी भूमिका तुषार भोसलेंनी घेतली आहे.