मंदिरं खुली करण्याची भाजपची मागणी, राज्य सरकारच्या निर्णयावर केली टीका

निर्बंध शिथील करताना राज्य सरकारनं लोकल बंदी कायम ठेवली आहे. तसंच, धार्मिक स्थळं पूर्वीप्रमाणेच बंद राहतील, असं जाहीर केलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष संतापला आहे. भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. 'राज्यात सगळे व्यवहार सुरू करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो. जेव्हा जेव्हा नवी नियमावली तयार होते, तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक मंदिरांवर बंदी कायम केली जाते,' असं भोसले यांनी म्हटलं आहे.

    ज्या शहरांत किंवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar bhosale) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

    निर्बंध शिथील करताना राज्य सरकारनं लोकल बंदी कायम ठेवली आहे. तसंच, धार्मिक स्थळं पूर्वीप्रमाणेच बंद राहतील, असं जाहीर केलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष संतापला आहे. भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यात सगळे व्यवहार सुरू करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो. जेव्हा जेव्हा नवी नियमावली तयार होते, तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक मंदिरांवर बंदी कायम केली जाते,’ असं भोसले यांनी म्हटलं आहे.

    ‘येणाऱ्या पाच दिवसांत आमचा पवित्र असा श्रावण महिना सुरू होतोय. त्यामुळं किमान लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडा आणि मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांना जगू द्या,’ अशी मागणी भोसले यांनी केली आहे.

    कोरोना काळात नियम आणि अटींच्या अधिपत्याखाली राहून सगळं काही सुरु असतं. मग मंदिरं उघडी ठेवायलाच काय अडचण होते. हे सरकार हिंदूविरोधी आहे. यांना हिंदूंचं काहीही देणंघेणं नाहीय, अशी टीका करत मंदिरं उघडण्यासाठी तुषार भोसले सातत्याने आग्रही असतात. अनेक वेळा मंदिर उघडण्याच्या मागणीवरुन तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.

    After Ease in Corona Restrictions BJP Demands to Reopen Temples