परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना संधी; ६ जुलैपासून आयडॉलची फेरपरीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे उन्हाळी सत्राच्या १८ मे ते ३१ मे २०२१ दरम्यान झालेल्या आयडॉलच्या प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम आणि ८ जून ते १९ जून २०२१ दरम्यान झालेल्या तृतीय वर्ष बीए व बीकॉम आणि पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉमची नियमित व पुनर्रपरीक्षार्थीची परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेच्या दरम्यान चक्रीवादळामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ६ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

    मुंबई : चक्रीवादळामुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे उन्हाळी सत्र मे व जून २०२१ मध्ये संपन्न झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए व बीकॉम आणि पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम परीक्षा देऊ न शकलेल्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ६ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

    शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे उन्हाळी सत्राच्या १८ मे ते ३१ मे २०२१ दरम्यान झालेल्या आयडॉलच्या प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम आणि ८ जून ते १९ जून २०२१ दरम्यान झालेल्या तृतीय वर्ष बीए व बीकॉम आणि पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉमची नियमित व पुनर्रपरीक्षार्थीची परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेच्या दरम्यान चक्रीवादळामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ६ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

    या परीक्षेमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग बरोबरच मुंबई,ठाणे, रायगड व पालघर येथील जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ६ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

    परीक्षेत अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची नवीन लिंक विद्यार्थ्यांच्या ईमेलवर पाठविली जाणार आहे. या फेरपरीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-openlearning/ या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. मे व जून २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेची विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली दिली आहे.

    या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या वेळेस तांत्रिक मदतीसाठी हेल्पलाईनच्या १० पेक्षा जास्त दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. तरी वरील परीक्षेत अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा द्यावी, असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.