गोकुळमध्ये विरोधी आघाडीची डोकेदुखी वाढली; पर्याय ‘खुला ‘चा उमेदवारांकडून नेत्यांना इशारा

संस्थांच्या ठरावांबरोबरच उमेदवारांच्या आर्थिक स्थितीचाही विचार होणार आहे. यातही विरोधी आघाडीकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने उमेदवारांनी नेत्यांनाच उमेदवारी न मिळाल्यास आव्हान देण्याचा इशारा दिल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

    मुंबई : गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीत आता चांगलीच चुरस वाढलीय, कारण या निवडणुकीत ४८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गोकुळच्या इतिहासात प्रथच एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीतील चुरस लक्षात पाहता दोन्ही आघाडीकडून तोडीसतोड असे उमेदवार देण्यात आले आहेत.

    मात्र, यापैकी काहीच उमेदवारांचा पॅनेलमध्ये समावेश होणार असल्याने या निवडणुकीत मोठ्या आर्थिक घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे आता संस्थांच्या ठरावांबरोबरच उमेदवारांच्या आर्थिक स्थितीचाही विचार होणार आहे. यातही विरोधी आघाडीकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने उमेदवारांनी नेत्यांनाच उमेदवारी न मिळाल्यास आव्हान देण्याचा इशारा दिल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

    यंदा गोकुळच्या निवडणुकीत टोकाची ईर्षा निर्माण झाल्याने प्रत्येक उमेदवाराकडे असलेल्या ठरावांची संख्याही
    लक्षात घेतली जाणार आहे. परिणामी, उमेदवारीसाठी नेत्यांकडून असे अनेक निकष लावले जाण्याची शक्यता आहे. तर आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांवर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.

    उमेदवारी द्या अन्यथा आम्हाला पर्याय खुला असल्याचा इशाराही काही इच्छुकांनी गोकुळचे शाहू आघाडीचे नेते मंत्री सतेज पाटील व हसम मुश्रीफ या नेत्यांना दिला आहे. परिणामी, पाटील- मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीची चांगलीच कसोटी ठरणार आहे. आघाडीच्या नेत्यांच्या डोकेदुखीत यामुळे चांगलीच वाढ झालीय.

    तर नवीन ३ जागा पळवण्यासाठी ही अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. संचालकपदासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याने अनेकांना कसरत करावी लागणार आहे. यासाठी कितीचीही बोली बोलण्याची तयारीही अनेक इच्छुकांनी केल्याचे समजते. अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर यांची उमेदवारी निश्चित असल्याने आता नाराजांची फौज उभी राहण्याची शक्यता आहे.