विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बौद्धिक दिवाळखोरी; बाळासाहेब थोरातांची कडाडून टीका

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात देश रसातळाला गेला असे म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे.

मुंबई : माजी पंतप्रधान डॉं. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या नेतृत्वात देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ नोंदवली गेली. त्यांच्या दहा वर्षांच्या काळात देशाता सरासरी विकास वाढीचा दर ७.५ टक्के राहिला. मनमोहन सिंग यांच्या काळात देश रसातळाला गेला असे म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे.

मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या (GDP) अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि रसातळ काय असतो याची ओळख स्वत:च देशाला पटवून दिली आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना लगावला आहे. जीएसटीचा परतावा राज्यांना देणे कायद्याने बंधनकारक असतानाही केंद्र सरकार (Central government)  हात वर करत आहे.यावरून मोदींच्या प्रतापाने देश आर्थिक दिवाळखोरीच्य उंबरठ्यावर आहे हे स्पष्ट आहे.