pravin darekar

विधिमंडळ सदस्यांना शासकीय कार्यालयांनी जनहितार्थ, कल्याणकारी योजनांची व कामांची माहिती दिली पाहिजे. असे नियमानुसार बंधन शासकीय कार्यालयांवर असताना अनेक पत्रं पाठवून सुध्दा माहिती देण्यात अक्षम्य टाळाटाळ केली जाते.  कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात शेकडो पत्र दिलीत. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या. त्यांच्याकडे काही माहितीही मागवली पण विरोधी पक्ष नेत्यांच्या  पत्रांना दोन ओळींच उत्तर देण्याचे सौजन्यही महापालिका आयुक्तांनी दाखवले नाही. असे प्रविण दरेकरांचे म्हणणे आहे.

मुंबई : मुबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्याविरुध्द विधीमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंग मांडणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली. अधिवेशनाच्या दुसऱ्यादिवशी अर्थात मंगळवारी ते सभागृहात हा ठराव मांडणार आहेत.

विधिमंडळ सदस्यांना शासकीय कार्यालयांनी जनहितार्थ, कल्याणकारी योजनांची व कामांची माहिती दिली पाहिजे. असे नियमानुसार बंधन शासकीय कार्यालयांवर असताना अनेक पत्रं पाठवून सुध्दा माहिती देण्यात अक्षम्य टाळाटाळ केली जाते.  कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात शेकडो पत्र दिलीत. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या. त्यांच्याकडे काही माहितीही मागवली पण विरोधी पक्ष नेत्यांच्या  पत्रांना दोन ओळींच उत्तर देण्याचे सौजन्यही महापालिका आयुक्तांनी दाखवले नाही.

प्रत्येकवेळी पत्रांना उत्तर देण्यासाठी टोलवाटोली केली. यामुळे विधिमंडळाने मला दिलेल्या अधिकाराला न्याय देता येत नाही. विधिमंडळाच्या मूलभूत हक्कावर यामुळे गदा येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तांवर विशेषाधिकारभंग आणणार असल्याची माहितीही दरेकर यांनी दिली.

विधीमंडळच्या कायदयाने सभासदांना विशेष अधिकार दिला आहे. पण विधानपरिषद व विधानसभा सदस्याच्या हक्कावर गदा येत असेल तर विधीमंडळात हक्कभंग आणण्याचा अधिकार सदस्यांना आहे. सदर विषय हक्कभंग होतो की नाही हे पिठासीन अधिका-यांच्या कार्यकक्षेत येते. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.