विरोधी पक्षनेत्यांनीही पूरग्रस्त भागांचा दौरा करावा : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

अनेक जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढली आहे. परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. अलमाटी, कोयना धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. त्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी आले असून नागरिकांना इतरत्र हलवण्याचे काम सुरू आहे. रायगड, पोलादपूर, चिपळूनला गावची गाव पाण्यात बुडाली आहे. चिपळूनहून 500 लोकांची सुटका करण्यात आली आहे. युद्धपातळीवर बचाव कार्य केलं जात आहे, असं मलिक म्हणाले.

    मुंबई: कोकण, कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्याचं पुनर्वसन केलं जाईल. पण हा नंतरचा भाग आहे. आधी त्यांचा जीव वाचवणं महत्त्वाचं असून त्यावर अधिक भर दिला जात आहे, असं सांगतानाच विरोधी पक्षानेही पूरग्रस्त भागाचा दौरा केला पाहिजे, असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

    अनेक जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढली आहे. परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. अलमाटी, कोयना धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. त्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी आले असून नागरिकांना इतरत्र हलवण्याचे काम सुरू आहे. रायगड, पोलादपूर, चिपळूनला गावची गाव पाण्यात बुडाली आहे. चिपळूनहून 500 लोकांची सुटका करण्यात आली आहे. युद्धपातळीवर बचाव कार्य केलं जात आहे, असं मलिक म्हणाले.

    राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटीलही नियोजन करत आहेत. पुराचा धोका असलेली गावं रिकामी केली जात आहेत. अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवून आढावा घेतला जात आहे. पुनर्वसन आणि मदत हा नंतरचा भाग आहे. लोकांचा जीव वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे, असं त्यांनी सांगितलं.