मुंबईत ऑरेंज अलर्ट,२४ तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

शनिवारपासून अतिवृष्टीने मुंबईची(Heavy Rain In Mumbai) दाणादाण उडविलेल्या पावसाने कालही मुंबईला काही झोडपले. मात्र सरीसरींनी कोसळल्या पावसाने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला नाही. आजही सकाळपासून वातावरण काळवंडलेले आहे.

  मुंबई : मुंबईसह(Mumbai) ठाणे आणि नवीमुंबईत आणखी दोन दिवस ऑरेंज अलर्ट(Orange Alert) घोषित करण्यात आला असून २४ तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा(Heavy Rain In Mumbai) वेधशाळेने दिला आहे. आज पावसाच्या सरींनी मुंबईला झोडपले. मात्र पावसाचा लोकल आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

  शनिवारपासून अतिवृष्टीने मुंबईची दाणादाण उडविलेल्या पावसाने कालही मुंबईला काही झोडपले. मात्र सरीसरींनी कोसळल्या पावसाने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला नाही. आजही सकाळपासून वातावरण काळवंडलेले आहे. जोरदार पाऊस कोसळेल असे वाटत आहे मात्र सकाळपासून अधूनमधून किरकोळ सरी कोसळत आहेत. त्यामुळे सखल भागात कुठेही पाणी भरलेले नाही. लोकल सेवा सुरळीत असून काही भागात वाहतूक कोंडी वगळता रस्ते वाहतूकही सुरळीत आहे.

  मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत सल्याने तुळशी आणि विहार पाठोपाठ तानसा आणि मोडकसागर हे दोन मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईवरील पाणी कपातीचे टेन्शन टळले आहे.

  समुद्राला सकाळी पावणे अकराच्या सुमारास साडेचार मीटरच्या लाटा समुद्रात उसळत होत्या. मात्र भरतीच्या काळात पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबईतील व्यवहार सुरळीत राहिले. मुंबईसह ठाणे आणि नवीमुंबईत मुंबईत आणखी दोन दिवस ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून २४ तासात मेघगजनेसह मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

  मिठी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचली होती. त्यामुळे बाजूच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आज पावसाचे प्रमाण कमी असल्याने मिठी नदी लगतच्या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

  पडझडीच्या घटना

  पूर्व उपनगरांत दोन आणि पश्चिम उपनगरात चार ठिकाणी घर व घराच्या भिंती कोसळल्या. शहर भागात दहा पूर्व उपनगरांत आठ व पश्चिम उपनगरांत बारा अशा एकूण तीस ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या. त्यात एकजण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

  पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट

  मुंबई, ठाणे व नवीमुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जाहिर करण्यात आला असून वादळी वार्यासह काही ठिकाणी मुसळधार तर अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.