मुंबईत ऑरेंज तर कोकणात हवामान खात्याकडून रेड अलर्ट

मुंबई :  मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.   

पुढच्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानातल्या या बदलांमुळे ३, ४ आणि ५  ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.