order cbd oil sushant shraddha kapoor SSR Death Case jaya saha
श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचे सत्य उघड

बॉलीवूडमधील (Bollywood) तारे-तारकांना चित्रपट, जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहाने (Jaya Saha) गरजेनुसार त्यांना ड्रग्ज पुरविल्याची (drugs supply) धक्कादायक बाब तिच्या चौकशीतून (enquitry) समोर आली.

  • जया साहाच्या कबुलीने बॉलीवूडचे सत्य उघड; नैराश्यामुळे अनेक जण ड्रग्जच्या आहारी

मुंबई (Mumbai) : बॉलीवूडमधील (Bollywood) तारे-तारकांना चित्रपट, जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहाने (Jaya Saha) गरजेनुसार त्यांना ड्रग्ज पुरविल्याची (drugs supply) धक्कादायक बाब तिच्या चौकशीतून (enquitry) समोर आली. अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor) आणि सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांना सीबीडी ऑइल (CBD Oil) पुरविल्याचीही कबुली तिने दिल्याचे समजते.

जयाकडे एनसीबी सलग गेले तीन दिवस सखोल चौकशी करीत आहे. क्वान कंपनीच्या दहा भागीदारांपैकी एक असलेल्या जयाचे मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट तपासून तिच्याकडे ड्रग्जबाबत चौकशी सुरू आहे. तिने श्रद्धा कपूरसाठी भारतात प्रतिबंधित ‘सीबीडी ऑइल’ची ऑनलाइन तजवीज केल्याची कबुली दिली. याशिवाय रिया चक्रवर्ती, सुशांत, चित्रपट निर्माता मधू मांटेना, स्वत:साठीही सीबीडी ऑइल मागविले होते. मात्र आतापर्यंत कोणत्याही ड्रज तस्कराशी संपर्क केला नसल्याचे तिने म्हटले. नैराश्यात असल्याने अनेक कलाकार ड्रग्जच्या आहारी गेल्याचे तिने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एनसीबीकडून चित्रपट निर्माता मधू मांटेनासह तिघांकडे कसून चौकशी

एनसीबीने जयाकडे बुधवारी सहा तास चौकशी केली. तिच्यासह मधू मांटेना, ‘क्वान’ टॅलेन्ट व्यवस्थापन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत विचारणा करण्यात आली.

सुशांत शेवटच्या भेटीत विक्षिप्तपणे वागला (SSR Death Case)

कुमार मंगल यांच्या आगामी चित्रपटासाठी ५ जून रोजी आपली सुशांतशी शेवटची भेट झाली. त्याला चित्रपटाची कथा आवडली होती. त्यासाठी त्याला सहा कोटींची ऑफर होती. मात्र त्याने १२ कोटी रुपये मागितले होते, अशी माहिती जयाने दिली. त्या भेटीवेळी सुशांत अतिशय विक्षिप्तपणे वागला. मध्येच उठून चालायचा, बेडरूममध्ये जायचा, असेही तिने जबाबात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.