सरकारचे अपयश झाकण्यासाठी राम मंदिराच्या पायाभरणीचे आयोजन – बाळासाहेब थोरात

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात भाजपवर टीका करत म्हणाले की, आयोध्येतील राम मंदिराची पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे सरकारचे अपयश झाकण्याचा डाव आहे. कोरोना काळात सराकचे अपयश झाकण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल जात आहे. 'श्री राम' हे दैवत आहेत. पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घेता येईल.

मुंबई – देशात कोरोना महामारी असताना रामजन्मभूमीच्या पायाभरणी समारंभ आयोजित केला आहे. यावरुन भाजपला सर्वच स्तरातून टीकेची झोड सोसावी लागत आहे. मुंबईतील महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की देशातील कोरोना परिस्थितीचे अपयश झाकण्यासाठी रामजन्मभूमीचे मंदिराचा पायाभरणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. कोरोनाच्या काळात सरकारचे अपयश झाकण्याचा हा डाव रचला जातोय. 

काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात भाजपवर टीका करत म्हणाले की, आयोध्येतील राम मंदिराची पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे सरकारचे अपयश झाकण्याचा डाव आहे. कोरोना काळात सराकचे अपयश झाकण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल जात आहे. ‘श्री राम’ हे दैवत आहेत. पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घेता येईल. मात्र आता माणसं जगवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत तसेच उपाययोजना केल्या पाहिजेत.

उद्धव ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्या विषयी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राम मंदिर हा मुख्यमंत्री ठाकरे यांचा श्रद्धेचा विषय आहे. आसे त्यांनी म्हटले आहे.