A lot of funds are needed to carry out development works in the constituency, informed Abdul Sattar

अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे तहसीलदारांनी महिलेच्या नावावर महसूल अभिलेखामध्ये फेरफार घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे तिचे म्हणणे आहे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, असाही आरोप संबंधित महिलेने केला आहे.

    मुंबई: शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीच जमीन हडपल्याने जीवन उध्वस्त झाल्याचा आरोप करत सिल्लोड येथील उंडणगावमधील आशाबाई बोराडे या महिलेने मंत्रालयाच्या प्रवेश व्दारा समोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या महिलेसोबत तिची मुलगी आणि सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड या देखील होत्या. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत तिघींनाही ताब्यात घेतले.

    नियमबाह्य पद्धतीने कॉलेजची इमारत उभारली 
    आजपासून राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश व्दारासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. त्यावेळी आंदोलन करत तीन महिलांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. मरीन ड्राईव्ह  पोलिसांनी या महिलाना ताब्यात घेतले.  आशाबाई बोराडे यानी जमिनीवर त्यांनी बेकायदेशीररित्या व नियमबाह्य पद्धतीने कॉलेजची इमारत उभारली आहे, असा आरोप केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या त्रासामुळे आमचे जीवन उध्वस्त होत असल्याचा आरोप करत सदर महिलांना केला आहे.

    निवेदन देऊनही दखल नसल्याने आंदोलन
    शेतकरी कुटुंबातील या महिलेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. मात्र अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे तहसीलदारांनी महिलेच्या नावावर महसूल अभिलेखामध्ये फेरफार घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे तिचे म्हणणे आहे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, असाही आरोप संबंधित महिलेने केला आहे. शासनाला निवेदन देऊन सुद्धा कुठलीही दखल न घेतल्याने आज मंत्रालयासमोर आंदोलन केल्याचे, आशाबाई बोराडे यांनी सांगितले.