१८४७ पैकी १०२४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी, ३३४ अर्ज छाननी प्रक्रियेत

संभाव्य कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदाही गणेशोत्सव मंडळांवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.

    मुंबई – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. उत्सवासाठी आतापर्यंत १०२४ सार्वजनिक मंडळांना परवानगी दिल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे १८४७ अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी १०२४ मंडळांना परवानगी दिली असून ३३४ अर्ज छाननी प्रक्रियेत असल्याची माहिती उपायुक्त काळे यांनी दिली.

    संभाव्य कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदाही गणेशोत्सव मंडळांवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.

    १२ हजाराहून अधिक सार्वजनिक मंडळे

    गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी मंडळांना दरवर्षी पालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. यंदा मंडप परवानगीसाठी पालिकेला कालपर्यंत १८४७ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त काळे यांनी दिली.