काेराेनाचा उद्रेक – दिवसाला राज्यात २३ हजार नविन रुग्णांची नोंद, काय आहे मुंबईची स्थिती?

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. राज्यात काेराेनाचा उद्रेक झाला आहे. दिवसाला राज्यात २३ हजार नविन रुग्णांची नोंद होत असल्याने चिंता वाढली आहे.

  मुंबई :  महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. राज्यात काेराेनाचा उद्रेक झाला आहे. दिवसाला राज्यात २३ हजार नविन रुग्णांची नोंद होत असल्याने चिंता वाढली आहे.

  बुधवारी राज्यात २३,१७९ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने रोजची नोंद आता २३ हजार पार गेली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २३,७०,५०७ झाली आहे. आज ९,१३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण १,५२,७६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सष्टेंबर, ऑक्टाेबर महिन्यात काेराेनाच्या रुग्णांची नाेंद २३ हजार पार झाली हाेती, दिवसेंदिवस काेराेना रुग्णसंख्या वाढतच चालली असल्यारचे दिसून येत आहे. नागरिक काेराेनाच्या नियमांचे पालन करत नसल्याने रुग्णसंख्ये वाढ हाेत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  दरम्यान,राज्यात आज ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ८४ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे- ७, नशिक-३, गडचिरोली- २, नागपूर- १ आणि नांदेड- १ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत २,३७७ कोरोना रुग्ण ; पाच महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येत वाढ

  मुंबईत मागील काही दिवसांपासून काेराेना रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. बुधवार काेराेना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले. गेल्या वर्षी सष्टेंबर व अाॅक्टाेबर महिन्यात काेराेना रुग्णसंख्येची राेजची आकडेवारी २५०० ते ३००० पार झाली हाेती. पुन्हा तब्बल पाच महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने आराेग्य विभागाची चिंता वाढली आहे. दरम्यान मुंबईत दिवसभरात २,३७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३,४९,९७४ एवढी झाली आहे. तर आज ८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११,५५१ मृत्यूची नोंद करण्यात आली.