corona

-आज राज्यात १२,१३४ नवीन रुग्ण
-३०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

मुंबई : शुक्रवारी राज्यात १२,१३४ नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याने आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १५,०६,०१८ एवढी झाली आहे. तर आज १७,३२३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १२,२९,३३९ करोना मुक्त झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,३६,४९१ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान राज्यात आज ३०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. मंडळ निहाय प्रमाणे ठाणे मंडळ ८७, नाशिक मंडळ ३४, पुणे मंडळ ६८, कोल्हापूर मंडळ ३६, औरंगाबाद मंडळ ९, लातूर मंडळ १६, अकोला मंडळ १४, नागपूर ३७, इतर राज्ये १ असे मृत्यू सांगण्यात आले. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७४,८७,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,०६,०१८ (२०.११ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,००,५८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.