The bodies of 49 people were found in the sea 600 crew members safe Naval rescue operation begins

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई हायजवळील दुर्घटनेतील एकूण 4 मृतदेह रविवारी आढळले. आतापर्यंत एकूण 70 मृतदेह हाती आल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 186 जणांचे प्राण वाचविण्यात नौदलासह अन्य बचावनौकांना यश आले आहे. शोधमोहीमेत आतापर्यंत 256 कर्मचाऱ्यांचा थांगपत्ता लागला आहे.

    मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई हायजवळील दुर्घटनेतील एकूण 4 मृतदेह रविवारी आढळले. आतापर्यंत एकूण 70 मृतदेह हाती आल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 186 जणांचे प्राण वाचविण्यात नौदलासह अन्य बचावनौकांना यश आले आहे. शोधमोहीमेत आतापर्यंत 256 कर्मचाऱ्यांचा थांगपत्ता लागला आहे.

    या 70 मृतदेहांमध्ये रायगडात सापडलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. रायगडात सापडलेले मृतदेह नेमके या घटनेतील की वराप्रदा या टग अपघातातील हे अद्याप अस्पष्ट असल्याचे वृत्त आहे.

    चक्रीवादळामुळे ‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात कार्यरत असलेली ‘पी-305’ ही बार्ज समुद्रात बुडाली. या अपघातात आत्तापर्यंत एकूण 70 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अजूनही काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध मोहीमेअंतर्गत शोध घेणे सुरू आहे.