Pakistan's hypocrisy Hafiz Saeed, mastermind of 26-11 Mumbai terror attacks, gets VIP treatment in Pakistan; He was released from prison before serving his sentence
A file photo of 26/11 Attacks on Mumbai. Ten heavily armed Pakistani terrorists had landed undetected in Mumbai's Badhwar Park in Colaba from the sea Nov 26, 2008, and laid siege to several key locations, including Chhatrapati Shivaji Terminus, Taj Mahal Hotel, Chabad House and Leopold Cafe. (Photo: Sandeep Mahankal/IANS)

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अंतर्गत माहितीनुसार सईद हा लाहौरच्या कोट लखपत तुरुंगात नसून त्याच्या घरी मजेत राहतो आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हाफिज सईद(Hafiz Saeed) हा अधिक वेळ त्याच्या घरातच असतो. ही अशी कोठडी आहे की ज्यात पाहुणेही त्याला येऊन भेटू शकतात.’

दिल्ली : लष्कर ए तोयबाचा संस्थापक, संयुक्त राष्ट्र परिषदेच्या यादीतील प्रमुख क्रमांकाचा दहशतवाद्यांचा प्रमुख आणि मुंबईवरील २६-११ हल्ल्याचा( 26-11 Mumbai terror attacks) मास्टरमाईंड हाफिज सईद(Hafiz Saeed) याला पाकिस्तानात(Pakistan) VIP ट्रिटमेंट मिळत आहे. पाकिस्तानाच्या तुरुंगात तो शिक्षा भोगत नाहीये, तर लाहौरमधील(lahaur) जोहर टाऊन परिसरातील त्याच्या घरात मोठ्या थाटात राहत आहे. इतकेच नाही तर घरातूनच दहशवादी कारवायांना बळ देण्याचे काम तो करत आहे. गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जुलै २०१९ मध्ये हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अधिकृतरित्या अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणात यावर्षी फेब्रुवारीमध्ये हाफिजला १० वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. हे दहशतवादी कृत्यांविरोधात महत्त्वाचे पाऊल असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यातही आले. गेल्याच आठवड्यात इतर दोन प्रकरणातही हाफिज सईदला शिक्षा सुनावण्यात आली.

वरवर ही दहशतवाद्यांचा म्होरक्या असलेल्या हाफिज सईदविरोओधात मोठी कारवाई वाटत असली, तरी प्रत्यक्षात पाकिस्तान सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचेच दिसून आले आहे. हाफिजची अटक आणि त्याला झालेली शिक्षा ही त्याचे नाव फायनान्शियल एक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅक लिस्टमध्ये येऊ नये, यासाठी इम्रान खान सरकारकडून करण्यात आलेली मदत असल्याचे मानण्यात येते आहे.

याहून धक्कादायक बाब म्हणजे गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अंतर्गत माहितीनुसार सईद हा लाहौरच्या कोट लखपत तुरुंगात नसून त्याच्या घरी मजेत राहतो आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ हाफिज सईद हा अधिक वेळ त्याच्या घरातच असतो. ही अशी कोठडी आहे की ज्यात पाहुणेही त्याला येऊन भेटू शकतात.’

२६-११ चा सूत्रधार जकी-ऊर लखवीने घेतली हाफिजची भेट

लष्कर ए तोयबाचा जिहाद विंग कमांडर जकी-ऊर रहमान लखवी याने गेल्याच महिन्यात हाफिज सईदची भेट घेतल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने देण्यात येत आहे. हाफिज सईद आणि जकी-उर रहमानच्या भेटीचा अजेंडा हा जिहादसाठी निधी उभारण्याबाबत होता  असेही सांगण्यात येत आहे. सईदप्रमाणेच लखवी हाही यूएनएससीकडून बंदी घालण्यात आलेला आणि २६-११ मुंबई हल्ल्यातील सूत्रधार आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे लखवीलाही पाकिस्तानात अनेकदा अटक करण्यात आली.  मात्र, हाफिज सईदप्रमाणेच कोणतेही पुरावे नसल्याचे कारण देत त्याची वेळोवेळी मुक्तताही करण्यात आली आहे. मुंबईवरील २६-११ दहशतवादी हल्ल्यापूर्वी, पाकिस्तानात जन्मलेल्या आणि अमेरिकन नागरिकत्व असलेल्या डेव्हीड हेडलीला रेकीसाठी तयार करुन मुंबईत पाठवणारा आणि मार्गदर्शन करणारा लखवीच होता  अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पाकिस्तानची दुटप्पी भूमिका

हाफिज सईद हा तरुंगात नसल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती ही पाकिस्तान सरकारच्या दहशवादी कारवायांना समर्थन देण्याच्या जुन्या चालीरितींप्रमाणेच असल्याचे पाकिस्तानाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. हाफिज सईदला १० वर्षे ६ महिन्यांच्या झालेल्या शिक्षेमुळे अनेक विश्लेषकांना सुरुवातीला धक्का बसला होता.  मात्र, यानिमित्ताने दहशतवाद्यांना आसरा देणारे राष्ट्र म्हणजे पाकिस्तान, हे या कारवाईतून स्पष्ट झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेवीरल ९-११ हल्ल्य़ानंतर सईदला अनेकदा अटक करण्यात आली आणि नंतर दबाव कमी झाल्यानंतर त्याला प्रत्येकवेळी सोडण्यातही आले आहे.

हाफिज सईदच्या न्यायलयीन कोठडीबाबत, पाकिस्तान सरकारने कागदोपत्री काय कारवाई केली याबाबत अजून स्पष्टता नसल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे हाफिज घरात असणे, ही अनौपचारिक व्यवस्था असण्याची शक्यता आहे. हाफिज सईदचे घर हेच कोठडी असल्याचे वा त्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे कोणते आदेश निघाले आहेत का? याबाबतही माहिती नसल्याचे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.