पाकिस्तानचा रिपोर्टर चांद नवाब पुन्हा एकदा आपल्या रिपोर्टिंगमुळे चर्चेत ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

चांद नवाब एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीत रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या रिपोर्टिंगच्या स्टाईलमुळे अगोदरच चर्चेत आले आहे. एका रेल्वे स्टेशनवर रिपोर्टिंग करत असताना प्रवाशांमुळे झालेला त्रास कॅमेऱ्यात कैद झाला. त्यांना अनेकदा रिटेक घ्यावा लागला. २०१८ मध्ये चांद नवाब यांचा हा फनी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आणि याच व्हिडिओने चांद नवाब हे एका रात्रीत लोकप्रिय झाले. 

    मुंबई : ‘बजरंगी भाईजान’ या सलमान खानच्या सिनेमातून चर्चेत आलेला पाकिस्तानचा रिपोर्टर चांद नवाब पुन्हा एकदा आपल्या रिपोर्टिंगमुळे चर्चेत आला आहे. यावेळी चांद नवाब यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांची मुलाखत घेतली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.  या व्हिडिओत रविवारी गोल्फ खेळत असलेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रपतींसोबत चांद नवाब यांनी गप्पा मारल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

    चांद नवाब यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींसमोर बूम धरून सुरूवात केले की, आपल्यासोबत आहेत सद्र ए पाकिस्तान डॉ आरिफ अल्वी साहेब. जे आज सुट्टीच्या दिवशी गोल्फ खेळत असून त्याचा आनंद लुटत आहेत. काय सांगणार सद्र साहेब आज? यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं की, पाकिस्तान आजा जी प्रगती करत आहे. त्याचा सगळ्यांना आनंद आहे. असे म्हटलं आहे.

    चांद नवाब एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीत रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या रिपोर्टिंगच्या स्टाईलमुळे अगोदरच चर्चेत आले आहे. एका रेल्वे स्टेशनवर रिपोर्टिंग करत असताना प्रवाशांमुळे झालेला त्रास कॅमेऱ्यात कैद झाला. त्यांना अनेकदा रिटेक घ्यावा लागला. २०१८ मध्ये चांद नवाब यांचा हा फनी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आणि याच व्हिडिओने चांद नवाब हे एका रात्रीत लोकप्रिय झाले.  चांद नवाब यांचं रिपोर्टिंग इतकं लोकप्रिय झालं की, ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात नवाजुद्दीनने साकारली होती भूमिका नवाजुद्दीनने ही भूमिका सिनेमात साकारली. नवाजुद्दीनने ही साकारलेली भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली.