24 types of corona virus China's claim

राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील गुहेत निपाह विषाणूची पुष्टी झाल्याने जनतेत दहशत पसरली आहे. महाबळेश्वरमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येत पर्यटक येत असतात. महाराष्ट्रात वटवाघळांमध्ये अशा प्रकारच्या विषाणूची पुष्टी प्रथमच झाली असून या घटनेनंतर महाबळेश्वर-पाचगणी येथील पर्यटनस्थळे तूर्तास बंद करण्यात आली आहेत.

    सातारा : राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील गुहेत निपाह विषाणूची पुष्टी झाल्याने जनतेत दहशत पसरली आहे. महाबळेश्वरमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येत पर्यटक येत असतात. महाराष्ट्रात वटवाघळांमध्ये अशा प्रकारच्या विषाणूची पुष्टी प्रथमच झाली असून या घटनेनंतर महाबळेश्वर-पाचगणी येथील पर्यटनस्थळे तूर्तास बंद करण्यात आली आहेत.

    ‘डेडली व्हायरस’

    निपाह हा विषाणू नवा प्रकार वगैरे नसून याचे संक्रमण रोखता येणे शक्य आहे. 2018 मध्ये केरळात 17 जणांचा या विषाणूमुळे मृ्त्यू झाला होदत. तथापि या विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या 75 टक्के मृत्यूची शक्यता असल्याने हा विषाणू धोकादायक समजला जातो. एक प्रकारे या विषाणूला ‘डेडली व्हायरस’ असेही म्हणतात. सद्यस्थितीत या विषाणूवर कोणतेही औषध उपलब्ध नाही.

    बाधित होण्याचा धोका सर्वाधिक

    हा विषाणू वटवाघळांमार्फत पसरतो. वाटवाघळं जी फळे खातात त्यावेळी त्यांची लाळ फळावरच राहते. त्यामुळे कोणताही व्यक्ती अथवा प्राणी जर ते फळ सेवन करीत असेल तर त्यामुळे तो सुद्धा बाधित होण्याचा धोका सर्वाधिक असतो.