pankaja munde

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी आता निगेटीव्ह(pankaja munde corona test negative) आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तसेच शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभारही मानले आहेत.

मुंबई :  भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला होता. त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले होते. मात्र पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी आता निगेटीव्ह(pankaja munde corona test negative) आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.


पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझी कोविड-१९ ची टेस्ट निगेटिव्ह आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार. मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा कोरोनाची चाचणी करणार आहे आणि मगच सार्वजनिक कार्यक्रमांना जाईन”.

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात गेल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप तापाचा  त्रास सुरु झाला. त्यामुळे त्या मुंबईला परतल्या होत्या. गुरुवारी पंकजा यांनी खबरदारी घेत आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांचे कार्यकर्ते चिंतातुर झाले होते. त्यांचे भाऊ आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही पंकजा यांना फोन करून तब्येतीची चौकशी केेली होती.