पंकजाताई शेवटच्या श्वासापर्यंत… भाजप माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य

भाजपच्या ओबीसी कार्यकर्त्याचा मेळावा आज मुंबईत होता त्यावेळी माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यानी मुंडे याच्या बद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, कार्यकर्ते हे पक्षावर प्रेम करतातच, पण कधी-कधी पक्षापेक्षा विशिष्ट नेत्यांवर थोडे जास्त प्रेम करतात. पंकजाताईंबद्दल आत्मीयता असलेल्या अशा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर पंकजाताईंनी त्यांना समजावताना काही शब्दांचा वापर केला असेलही, पण याचा अर्थ त्या नाराज आहेत असे मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत,' असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    मुंबई : पंकजाताईंनी त्यांना समजावताना काही शब्दांचा वापर केला असेलही, पण याचा अर्थ त्या नाराज आहेत असे मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत,’ असा विश्वास भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार  यांना स्थान न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा होती. मुंबईत समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी ही चर्चा फेटाळली व समर्थकांची समजूत घातली. मात्र, त्यानंतरही त्या नाराज असल्याची चर्चा कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी मंत्री मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले आहे.

    मुंडे याच्या बद्दल विश्वास

    भाजपच्या ओबीसी कार्यकर्त्याचा मेळावा आज मुंबईत होता त्यावेळी माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यानी मुंडे याच्या बद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, कार्यकर्ते हे पक्षावर प्रेम करतातच, पण कधी-कधी पक्षापेक्षा विशिष्ट नेत्यांवर थोडे जास्त प्रेम करतात. पंकजाताईंबद्दल आत्मीयता असलेल्या अशा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर पंकजाताईंनी त्यांना समजावताना काही शब्दांचा वापर केला असेलही, पण याचा अर्थ त्या नाराज आहेत असे मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत,’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    इथे राम नाही असे वाटेल तेव्हा निर्णय घेऊ

    केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम यांची वर्णी लागली नाही. मुंडे भगिनींना राजकीय शह देण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा होती. त्यातून मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातील ७० ते ८० लोकांनी पक्षातील आपल्या विविध पदांचे राजीनामे देण्याची घोषणा केली, त्यांचे राजीनामे फेटाळत पंकजा यांनी त्यांची समजूत काढली. ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच माझे नेते आहेत. असे त्या म्हणाल्या होत्या. ‘हे आपले घर आहे. ज्यादिवशी छत अंगावर पडेल आणि इथे राहण्यात राम नाही असे वाटेल तेव्हा पुढचा निर्णय घेऊ,’ असे त्या म्हणाल्या होत्या.