पंकजा मुंडे आता नेत्या; भेटी नंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे व्टिट !

पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो. मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत.

    मुंबई: नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांसोबत बैठकीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नव निर्वाचित राज्यमंत्री डॉ भागवत कराड याची भेट घेतली. त्यानंतर डॉ कराड यांनी व्टिट करत मुंडे साहेब आधी नेते होते आता ताई आहेत असे म्हटले आहे. नव्या मंत्रिमंडळात खासदार प्रतिम मुंडे याना डावलून डॉ कराड यांना स्थान दिल्यानंतर मुंडे भगिनीनी त्याना शुभेच्छा देखील दिल्या नव्हत्या. मात्र त्यानंतर दिल्लीला  बैठकीच्या निमित्ताने गेलेल्या पंकजा मुंडे यानी डॉ कराड याची काल भेट घेतली. डॉ. भागवत कराड यांनीच ही माहिती व्टिट केली आहे.

    साहेब माझे नेते होते आणि आज ताई

    केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू असतानाच पंकजा मुंडे पूर्वनियोजीत बैठकाना हजेरी लावण्यासाठी दोन दिवस दिल्लीत होत्या. त्यावेळी त्यानी डॉ कराड याना भेटून शुभेच्छा दिल्या. भागवत कराड यांनी सोमवारी रात्री भेटीनंतर ट्विट केले त्यात म्हटले आहे की, पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो. मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाण शुभेच्छा दिल्या, असे डॉ कराड यांनी म्हटले आहे. यावेळी पंकजा मुंडे व डॉ भागवत कराड यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.