Pankaja Munde will never think of rebellion, says BJP state president Chandrakant Patil

काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावर पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घ्यावे हे त्यांना वाटले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदके दिली, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हते अशा लोकांचा सन्मान केला. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो, असे पाटील म्हणाले.

    कोल्हापूर : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी कार्यालयातील भाजप रस्त्यावर आणली. केवळ पत्रके काढून भागणार नाही तर रस्त्यावर उतरले पाहिजे या भावनेतून त्यांनी पक्ष वाढवला. अनेक संघर्ष केले. मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडखोरीचा विचार करणार नाहीत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

    पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच प्रयत्न

    काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावर पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घ्यावे हे त्यांना वाटले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदके दिली, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हते अशा लोकांचा सन्मान केला. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो, असे पाटील म्हणाले.

    लगेच सावरणे हे समजदारीचे लक्षण

    न्याय करताना कोणावर तरी अन्याय होतो. न्याय सर्वांनाच एकावेळी मिळू शकत नाही. भागवत कराडांना मंत्रिपद मिळाले तर प्रीतम यांना मिळणार नाही. राणेंना मिळाले तर रणजीत निंबाळकरांना नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात २८ जणांना जोडायचे होते. त्यासाठी १२ मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ४० जणांना जोडायचे होते. त्यात नेता नव्हे कार्यकर्त्याने रिअॅक्ट होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यात काही चुकीचे नाही. पण लगेच सावरणे हे सुद्धा समजदारीचे लक्षण आहे. ते काल पंकजा यांनी केले. कुणी राजीनामे द्यायचे नाही. हे आपले घर आहे. आपल्या घरातून का निघायचे बाहेर, असे विचारले. त्यांच्यावर इतके दुखाचे डोंगर कोसळले आहेत. तरीही त्यांनी सांभाळले, असे पाटील म्हणाले.