पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक तथा माजी मंत्री महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला;  भाजपला धक्का देण्याच्या तयारीत?

महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्रपक्षांनी नवी राजकीय मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. मात्र, ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचे सांगत जानकर यांनी या चर्चाना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई :  भारतीय जनता पक्षासोबत मैत्री करत २०१४मध्ये दुग्धव्यवसाय विकास मंत्री झालेले महादेव जानकर यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जानकर यांनी मागील काळात बारामती विरोधातील मोहिमेत भाजपची साथ दिली होती.  शिवाय ते माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक मानले जातात त्यामुळे त्यांच्या भेटीने भाजपला मोठा धक्का देण्याची तयारी सत्ताधारी आघाडीकडून केली जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचे सांगत जानकर यांनी या चर्चाना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे

महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्रपक्षांनी नवी राजकीय मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. मात्र, ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचे सांगत जानकर यांनी या चर्चाना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.

महादेव जानकर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची तीन डिंसेंबरला भेट घेतली होती. यावेळी नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबते झाल्याचे सांगण्यात येते. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचे सांगितले आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामा निमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. तसेच पवारांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला आहे.

मात्र, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदांच्या निवडणुका, त्यात भाजपला अपयश आल्यानंतर जानकर यांच्या भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहीले जात आहे. आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जानकर भाजपच्या मित्रपक्षांची आघाडी करत नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. जानकरांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरी ते पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या राजकीय चालीमागे पंकजा मुंडे या नव्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा डाव असू शकतो असेही सांगितले जात आहे. कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी जानकरांकडून जुळवाजुळव करण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत. सध्या ओबीसी राजकारणासाठी राज्यात प्रयत्न सुरू आहेत त्यात पवार पंकजामुंडे यांच्यासह धनगर आणि इतर मागास वर्गाची वेगळी आघाडी करत भाजपची फोड करू शकतात असे मानले जात आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपच्या परंपरागत मतदारांनी साथ सोडल्याचे दिसत आहे. त्याचा फायदा सत्ताधारी आघाडी घेवू शकते.

लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामतीतून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी प्रचंड मते घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिला होता. खडकवासल्यात जानकरांना चांगली मते मिळाली होती. तर इंदापूर आणि भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना जेमतेम मते मिळाली होती. बारामतीत सुप्रिया यांना एक लाख ४२ हजार ६२८ मते, तर जानकर यांना अवघी ५२ हजार मते मिळू शकली. त्यामुळे जानकरांना सोबत आणून बारामतीचे राजकारण सुरक्षीत करण्याचाही पवार यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.