parambeer singh

लेटरबॉम्बनंतर(letterbomb) परमबीर सिंग(parambeer singh) यांनी सुप्रीम कोर्टात याचिका(appela in supreme court) दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत परमबीर सिंग यांनी म्हटले आहे की, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा. अनिल देशमुखांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, त्यामुळे खरे काय ते बाहेर येईल.

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी पत्र लिहून आणि त्या पत्रामध्ये गंभीर आरोप करुन खळबळ निर्माण केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी महिन्याला १०० कोटी जमा करायला सांगितल्याचे विधान परमबीर सिंग यांनी केले आहे.असा आरोप झाल्यानंतरही  राज्य सरकारने अजून कोणतीही कारवाई न केल्यामुळे आता परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

    याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितले होते.हे एक मोठं षड्यंत्र आहे, पोलीस विभागाला खंडणी मागायला लावणं याला  माफीच असू शकत नाही. सुप्रीम कोर्ट पुराव्याच्या आधारे निर्णय करेल’, अस परमबीर सिंग यांनी म्हटलं होत.

    याचिकेत काय ?

    सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत परमबीर सिंग यांनी म्हटले आहे की, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा. अनिल देशमुखांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, त्यामुळे खरे काय ते बाहेर येईल. तसेच ट्रान्सफर पोस्टींगबाबत जो अहवाल रश्मि शुक्ला यांनी जाहीर केला आहे त्याचीही चौकशी करण्यात यावी.