बुडत्याचा पाय खोलात’ परमबीर सिंहांनी चौकशीसाठी ‘ईडी’कडे मागितला जास्तीचा वेळ!

कथित शंभर कोटी खंडणी प्रकरणासंबंधी पैशांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करीत आहे. त्यामध्ये परमबीर यांची देखील चौकशी करून त्यांचा जबाब  सक्त वसुली संचालनालयाला ('ईडी') ला  त्यांचा जबाब हवा आहे. त्यासाठीच त्यांना सोमवारी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. 

  मुंबई: तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या कथित खंडणीचे आरोप करणारे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यानी स्वत:च सुरू केलेल्या खेळात ते अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सक्त वसुली संचलनालयाने त्यांना चौकशी साठी नोटीस बजावली असता त्यानी आता आणखी वेळ हवा आहे.असे उत्तर सक्त वसुली संचालनालयाला समन्सच्या उत्तरात कळविल्याचे समजते

  तब्येत बरी नाही आणखी वेळ हवा

  कथित शंभर कोटी खंडणी प्रकरणासंबंधी पैशांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करीत आहे. त्यामध्ये परमबीर यांची देखील चौकशी करून त्यांचा जबाब  सक्त वसुली संचालनालयाला (‘ईडी’) ला  त्यांचा जबाब हवा आहे. त्यासाठीच त्यांना सोमवारी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता.

  मात्र त्यांनी चौकशीला उपस्थित न राहता ‘ईडी’ला उत्तर पाठवले की, मागील काही दिवसांपासून तब्येत बरी नाही. त्याचवेळी लवकरच आपल्याला एक शस्त्रक्रियादेखील करायची आहे. त्यामुळेच चौकशी व जबाब नोंदवण्यासाठी आणखी वेळ हवा आहे!

  खंडणी बाबत वाझेची कबुली

  या प्रकरणातील मुख्य आरोपी व निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेदेखील ईडीने चौकशी केली. अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी देशमुख यांनी काही बारमालकांची यादी सोपवून खंडणी गोळा करण्यास सांगण्यात आले’ असे वाझेच्या जबाबात म्हटले असल्याचे  सूत्रांचे मत आहे.

  याप्रकरणी ‘ईडी’ला आवश्यक असलेली चौकशी जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक अटकेत आहेत. वाझेचादेखील जबाब नोंदवण्यात आला आहे. आता केवळ देशमुख व परमबीर यांचा जबाब नोंदवणे व चौकशी बाकी आहे. त्यामुळेच हा तपास अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे