परमबीर सिंह यांना १५ जूनपर्यंत दिलासा कायम, ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात तूर्तास अटक नाही ; राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंह यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे केली होती. तसेच परमबीर यांच्यासह ३२ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात (ऑनलाईन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मुंबई : ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवल्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना १५ जूनपर्यंत अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्यावतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. मात्र तोपर्यंत परमबीर यांनी तपासयंत्रणेला तपासात संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे सिंह यांना तूर्तास अटेकेपसून दिलेला दिलासा मिळाला आहे.

    ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंह यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे केली होती. तसेच परमबीर यांच्यासह ३२ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात (ऑनलाईन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यात भारतीय दंड संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध २२ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकऱण ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून परमबीर सिंह उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

    त्यावर सोमवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर व्हिसामार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, या प्रकरणावर गुरूवारी वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना तूर्तास अटेकेपसून दिलेला दिलासा पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवत सुनावणी तहकूब केली.

    काय आहे घाडगे यांची तक्रार

    साल २०१५ ते २०१८ मध्ये घडलेल्या काही प्रकरणांचा तपास करताना ठराविक लोकांना आरोपी न करण्यास परमबीर सिंह यांनी घाडगे यांना सांगूनही घाडगे यांनी हे मान्य केलं नाही. त्यामुळे त्यांना परमबीर सिंह यांनी आपल्याला मानहानीकारक वागणूक दिली, त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले, आणि जातीवाचक शिविगाळ करत मानसिक छळ केला असे आरोप या तक्रारीत केलेले आहेत.