परमबिर सिंग, वाझेंच्या चुका माफ करण्यालायक नव्हत्या; नेमकं काय म्हणणं आहे अनिल देखमुखांचे?

निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वझे व परमबिर सिंग यांच्या गंभीर चुका होत्या आणि त्या माफ करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या. त्याचा तपास एनआयए करीत आहे. म्हणुन मी त्यांची मुंबई आयुक्तपदावरुन बदली केली होती. तसेच एका कार्यक्रमात या संदर्भातचे मी जाहीर वक्तव्य सुध्दा केले होते. त्याच्या रागापोटी त्यांची बदली केल्यानंतर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षाच्या राजकीय जिवनात माझ्यावर एक सुध्दा आरोप नाही. परमबिर सिंग यांच्या  खोटया आरोपावरुन माझ्यावर जो सीबीआय ने गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागीतली आहे. अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात दिली आहे  देशमुख यांच्यावर सुरू असलेल्या सीबीआय चौकशी आणि आरोप प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    मुंबई :  निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वझे व परमबिर सिंग यांच्या गंभीर चुका होत्या आणि त्या माफ करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या. त्याचा तपास एनआयए करीत आहे. म्हणुन मी त्यांची मुंबई आयुक्तपदावरुन बदली केली होती. तसेच एका कार्यक्रमात या संदर्भातचे मी जाहीर वक्तव्य सुध्दा केले होते. त्याच्या रागापोटी त्यांची बदली केल्यानंतर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षाच्या राजकीय जिवनात माझ्यावर एक सुध्दा आरोप नाही. परमबिर सिंग यांच्या  खोटया आरोपावरुन माझ्यावर जो सीबीआय ने गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागीतली आहे. अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात दिली आहे  देशमुख यांच्यावर सुरू असलेल्या सीबीआय चौकशी आणि आरोप प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    वाझे आणि सिंग यांच्या अक्षम्य चूका

    या प्रकरणी देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही वाहिन्यांमधुन परमबिर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनविन आरोप आता समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वझे व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांची भुमिका संशयास्पद असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सचिन वझे व परमबिर सिंग यांच्या गंभीर चुका होत्या आणि त्या माफ करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या. त्याचा तपास NIA करीत आहे असे देशमुख यांनी म्हटले आहे.

    ३० वर्षात एकही आरोप नाही

    त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘म्हणुन मी त्यांची मुंबई आयुक्त पदावरुन बदली केली होती. तसेच एका कार्यक्रमात या संदर्भातचे मी जाहीर वक्तव्य सुध्दा केले होते. त्याच्या रागापोटी त्यांची बदली केल्यानंतर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षाच्या राजकीय जिवनात माझ्यावर एक सुध्दा आरोप नाही. परमबिर सिंग यांच्या  खोटया आरोपावरुन माझ्यावर जो CBI ने गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागीतली आहे.