साडे सहा तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर परमबीर सिंग यांच्यासह अन्य २ याचिकांवरील युक्तिवाद पूर्ण

या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मिळाली आहे. याचा अर्थ तपासासाठी यात काहीतरी दडलं आहे, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवावं, याचिकाकर्त्यांची न्यायालयाकडे मागणी आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता. याप्रकरणी, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यांतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. साडे सहा तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर परमबीर सिंह यांच्यासह अन्य दोन जनहित याचिकांवरील युक्तिवाद एका दिवसामध्ये पूर्ण झाला आहे.

    युक्तिवाद पूर्ण झाला असला तरी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे.या प्रकरणाची आम्ही ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्यास तयार आहोत. मात्र, त्याबाबात न्यायालयाने आम्हाला निर्देश द्यावेत अशी मागणी केंद्राच्या वतीने बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाने केली आहे.

    या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मिळाली आहे. याचा अर्थ तपासासाठी यात काहीतरी दडलं आहे, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवावं, याचिकाकर्त्यांची न्यायालयाकडे मागणी केली होती.

    दरम्यान, आता परमबीर सिंग लेटरबाँब प्रकरणी घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर युक्तिवाद करण्यात आला. तो आता पूर्ण झाला आहे.