परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या, 9 लाख रुपये व सॅमसंग कंपनीचे 2 फोल्ड मोबाईल हफ्ता म्हणून घेतल्याचा बार मालकाचा आरोप

बार चालवण्यासाठी पोलिस अधिकारी परमबिर सिंह आणि त्यांच्या अन्य साथिदारांनी विमल अग्रवाल यांच्याकडून 9 लाख रुपये व सॅमसंग कंपनीचे 2 फोल्ड मोबाईल हफ्ता म्हणून घेतल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

    मुंबईतील एका बार मालकाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या विरोधात 9 लाख रुपये व सॅमसंग कंपनीचे 2 फोल्ड मोबाईल हफ्ता म्हणून घेतल्याची तक्रार गोरेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे आता परमबिर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील माहिती दिली असून, एएनआयच्या वृत्तानुसार गोरेगावमधे रहाणाऱ्या विमल अग्रवाल यांचे गोरेगाव आणि अंधेरीच्या ओशिवारा भागात रेस्टॉरेंट आणि बार आहेत. हा व्यवसाय ते भागिदारीत चालवतात.

    हा बार चालवण्यासाठी पोलिस अधिकारी परमबिर सिंह आणि त्यांच्या अन्य साथिदारांनी विमल अग्रवाल यांच्याकडून 9 लाख रुपये व सॅमसंग कंपनीचे 2 फोल्ड मोबाईल हफ्ता म्हणून घेतल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

    विमल अग्रवाल यांनी परमबिर सिंह यांच्या सोबतच सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल , विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्या नावाचा उल्लेख देखील आपल्या तक्रारीत केला आहे.